म.न.पा शाळा जेवड च्या विद्यार्थ्यांनी केले माता पिता तसेच गुरुजनांचे पूजन
अमरावती :- फेब्रुवारी महिना म्हटला की व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चात्त्य संस्कृतीचे बीज भारतीय संस्कृतीमध्ये दिवसेंदिवस फोफावत आहे त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीकडे वहावत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बालपणीच मातृ-पितृ पूजनाचे महत्त्व समजले व तो संस्कार बालमनावर रुजवला गेला तर निश्चितच समाजाला एक दिशा मिळू शकते. मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा जेवड येथे शाळेतील हरहुन्नरी व कल्पक शिक्षक श्री प्रशांत नालसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये मातृ-पितृ पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सन्माननीय सचिनची कलंत्रे आयुक्त महानगरपालिका अमरावती हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय डॉक्टर प्रकाशजी मेश्राम शिक्षणाधिकारी मनपा अमरावती श्री सुधीर खोडे विस्तार अधिकारी पंचायत समिती अमरावती शाळा निरीक्षक श्री वहिदखान सर हे उपस्थित होते. याप्रसंगी सन्माननीय आयुक्त यांनी अशा प्रकारचे बालसंस्कार रुजवण्यासाठी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल श्री नालसे सर तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांचे कौतुक केले . शाळा उपक्रमशील असून शाळेचे नाव मनपा क्षेत्रामध्ये सर्व दूरपर्यंत पसरलेले आहे तसेच शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर असल्याबद्दल प्रशंसओद्गार काढले. सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाशजी मेश्राम यांनी मातृ पितृ पूजन घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच शाळेने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी अशा शुभेच्छा देखील दिल्या. सन्माननीय विस्तार अधिकारी यांनी या उपक्रमांमधून समाजाला एक नवीन संदेश दिला व विद्यार्थी व पालकांचे संबंध दृढ होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे विचार व्यक्त केले. श्री वहिद खान सर यांनी शारीरिक वाढीसोबतच विद्यार्थ्यांची मानसिक वाढ देखील निकोप होणे गरजेचे असल्या मुळे
यासारखे कार्यक्रम घेणे हे आज सामाजिक गरज बनली आहे असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक वेदांत सेवा समितीचे अध्यक्ष मानव श्री मानव बारबुधे सर व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय भावुक वातावरणात विद्यार्थ्यांकडून मातृ पितृ पूजन तसेच गुरुजनांचे पूजनाचा कार्यक्रम घडवून आणला याप्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच सर्व गुरुजन एका वेगळ्या भाविश्वात जाऊन हा क्षण अनुभवत होते. या प्रसंगाने विद्यार्थी पालक व गुरुजन यांच्या डोळ्यात अश्रू तळरले व आपल्या जबाबदारीची पुनश्च एकदा जाणीव झाली. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेतला व जाताना शाळेविषयी व विद्यार्थ्यांप्रती असलेली मनातील भावना व्यक्त करत शाळेचे आभार मानले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना सावजी या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रशांत नालसे ,कु वैशाली बुटे, सौ.सीमा शिरभाते, श्रीमती डांगे ,कु. किरण नालींदे, कु.चंचल दातीर,कु. सोनाली चापके कु.पुष्पा कोरडे, सौ.हर्षा दिवे, कु.किरण शेंडे, सौ.माधुरी ढाकूलकर, श्री.शिरीष फसाटे, श्री श्याम गोंगे, श्री.जितेंद्र चवरे कु. स्वाती भटकर सौ.उल्का खेडकर,सौ.वर्षा यावलकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता श्री भूषण वाघ श्री आकाश पोंगळे व श्री सुनील भाऊ डहाके यांनी प्रयत्न केले.