रहस्यमय मृत्यू प्रकरण गूढ वाढलं पोलिस तपास सुरू

नागपूर :- सायंकाळी एका महिलेच्या रहस्यमय मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. 58 वर्षीय मुन्नीबाई यादव या आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या. मात्र, या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
26 फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांना एका महिलेमृत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. मृत महिलेचे नाव मुन्नीबाई सुरेश यादव, वय 58, असून त्या आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या.
प्राथमिक तपासात मृतदेहावर कुठल्याही जखमा किंवा घाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. मृत महिलेच्या दोन्ही मुलांनी तिला आधी हॉस्पिटलला नेले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि पोलिस तक्रार करण्यास सांगितले.
मुलांनी मृतदेह घरी आणून पोलिसांना फोन केला. या सर्व घटनेत काहीतरी गूढ आहे का, याचा तपास आता पोलिस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिस मृत महिलेच्या मुलांची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना नेमकी नैसर्गिक मृत्यू आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून लवकरच सत्य समोर येईल.