राजवीर संघटनेचा मनपा आयुक्तांना इशारा! अमरावतीत जनतेचा संताप!

अमरावती :- अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे! राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बहुल पश्चिम परिसरातील साफसफाई आणि घरपट्टी करावरील व्याज या गंभीर मुद्द्यांवर मनपा आयुक्तांना घेराव घालण्यात आला! जनतेने भरलेले व्याज परत द्या, भ्रष्टाचार थांबवा आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमण हटवा,अशा जोरदार मागण्यांसह शहरभर संताप व्यक्त केला जात आहे.
अमरावतीच्या मुस्लिम बहुल पश्चिम परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे, असा आरोप करत राजवीर जनहित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मनपा प्रशासनाला धारेवर धरले! नियमाप्रमाणे प्रत्येक प्रभागात २४ सफाई कर्मचारी असायला हवेत, पण प्रत्यक्षात ८ ते १० कर्मचारीच काम करतात, तेही फक्त २-३ तासांसाठी!रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग, नसलेले कचरा कंटेनर, फवारणीचा अभाव, यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे! मनपाची कचरा उचलणारी गाडी कचरा टनाने उचलण्याऐवजी भ्रष्टाचार करून कमी कचऱ्यावर मोठी बिले फाडते, असा देखील गंभीर आरोप संघटनेने केला आहे!
शहरात लोक कर भरतात, पण सुविधा मिळत नाहीत! आता मनपाला झोपेतून उठवायचे आहे! आम्ही लढत राहू, न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही!”अशी प्रतिक्रिया रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी यावेळी दिली.
तसेच, नवसारी सर्वे नंबर ७८ आणि ९८ येथील मनपाने आरक्षित ठेवलेल्या जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून लाखो रुपयांना जागा विकल्या, असा मोठा गौप्यस्फोट देखील या आंदोलनात करण्यात आला! ही जमीन ताब्यात घेऊन बेघर नागरिकांना वाटली जावी, अशी संघटनेची ठाम मागणी आहे!आम्ही येथे अनेक वर्षे राहतो, पण मनपाला आम्ही दिसत नाही का? ना स्वच्छता, ना सुविधा! आता आम्ही शांत बसणार नाही!
शहरातील नागरिकांकडून चारपट वाढवलेला घरपट्टी कर आणि त्यावरील व्याज हा आणखी एक ज्वलंत मुद्दा या आंदोलनात उपस्थित करण्यात आला! राज्य सरकारने यावर स्थगिती दिली असतानाही मनपाने व्याज वसूल केले आणि लोकांची लूट केली! आता ते व्याज नागरिकांना परत केले जावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजवीर संघटनेने दिला आहे!आम्ही भरलेला व्याजाचा पैसा आम्हाला परत मिळायलाच हवा! हा सरळ सरळ आर्थिक अन्याय आहे.
तर पाहिलंत, अमरावतीत जनता आता आवाज उठवते आहे! प्रश्न एवढाच आहे – मनपा प्रशासन जागेल का? लोकांचे पैसे परत मिळतील का? आणि भूमाफियांवर कारवाई होईल का?आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे. पुढील अपडेटसाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजला फॉलो करा! धन्यवाद!