LIVE STREAM

BollywoodLatest News

विवाहीत महिलांसोबत डबल डेट आणि पत्नीची फसवणूक

‘बिग बॉस 18’ आणि त्यानंतक ‘खतरों के खिलाडी 14’ चा विजेता करण वीर मेहरा हा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. कधी त्यानं म्हटलं की ‘बिग बॉस 18’ जिंकल्यानंतरही त्याला विजेते पदाची रक्कम मिळाली नाही. तर कधी दुसरं काही, मात्र सध्या त्याचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याचं चुम दरांगसोबत असलेलं रिलेशनशिप आहे. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृत केलं. करणनं आधी दोन वेळा लग्न केलं आहे आणि दोन्ही वेळा त्याचा घटस्फोट झाला आहे. करणनं एका मुलाखतीत त्याच्या अयशस्वी लग्नाविषयी वक्तव्य केलं आहे. तर एका शोमध्ये त्यानं हे मान्य केलं की त्यानं फक्त त्याच्या पत्नीची फसवणूक केली नाही तर त्यासोबत विवाहित महिलांना देखील डबलडेट केलं आहे.

करण वीर मेहराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्याचा एपिसोड हा यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. या शोचा संपूर्ण एपिसोड हा यूट्यूबवर आहे. करणनं तेव्हा शिल्पा शिंदेसोबत अली असगर आणि बख्तियार ईरानीचा शो ‘चड्डी बड्डी सीजन 2’ मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये बख्तियार आणि अली असगरनं Never Have I Ever या नावाचा गेम खेळला होता. त्यात एकामागे-एक काही प्रश्न विचारतात आणि त्यांचं उत्तर देताना दिसतात. जर उत्तर योग्य असेल तर मग कॉफीचं सीप प्यावा लागतो.

अली असगरनं करण वीर मेहरा आणि शिल्पा शिंदेला विचारलं की त्यांनी कधी कोणत्या विवाहीत महिला किंवा पुरुषाला डेट केलं आहे? त्या प्रश्नावर शिल्पानं नकार दिला, तर करणनं लगेच कॉफीचा एक घोट प्यायला. त्याला विचारलं की डबल डेट केलंय? पार्टनरला चीट केलं? तर करण वीरनं लगेच कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाला, ‘जर त्याला फसवणूक म्हणतात. भावनिकदृष्ट्या कधीच नाही.’

करण वीर मेहरानं आधी लग्न देविकाशी केलं. जी त्याची शाळेपासूनची मैत्रिण होती. दोघांनी 2009 मध्ये लग्न केलं पण 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये करण वीर आणि अभिनेत्री निधी मेहरा भेटले. हा कोरोनाचा काळ होता. त्याकाळात त्यांनी लग्न केलं आणि मग 2023 मध्ये त्यांचा देखील घटस्फोट झाला. करणनं त्याच्या या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नाविषयी ‘बिग बॉस 18’ मध्ये कशिश कपूरला सांगितलं होतं.

करणनं सांगितलं की ‘माझ्या पहिल्या लग्नात आम्ही दोघे बदललो. लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही प्रेमात होतो तेव्हा आम्ही जसे होतो तसे आम्ही आता राहिलो नव्हतो. दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना करण म्हणाला, आम्हाला माहित नव्हतं की तिसरा आणि चौथा लॉकडाउन कधी होणार. हे तिचं निधी चं देखील दुसरं लग्न होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी हे लग्न शेवट पर्यंत राहिलं. त्यामुळे घाईत आम्ही करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं.’

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!