अखिल भारतीय मराठा महासंघाचे दर्यापुर तालुका अध्यक्ष पदी श्री भाष्करराव सावरकर यांची नियुक्ति

अमरावती, दर्यापुर :- नुकताच अखिल भारतीय मराठा महासंघाची विदर्भ स्तरीय पदाधिकारी यांची अमरावती येथे आढावा बैठक संपन्न झाली या बैठकी मध्ये दर्यापुर तालुका अध्यक्ष पदी श्री भाष्करराव सावरकर यांची नियुक्ति करण्यात आली. दि 27/फेबृवारी रोज गुरूवार ला अखिल भारतीय मराठा महासंघाचे विदर्भातिल संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकी नंतर श्री गणेशराव रेखे यांची अमरावती जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ति झाल्यामुळे दर्यापुर तालुका अध्यक्ष पद रिक्त झाले वरून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्रजी कोंढरे यानी दर्यापुर तालुका अध्यक्ष पदी श्री भाष्करराव सावरकर यांची नियुक्ति केली नियुक्ति नंतर श्री भाष्करराव सावरकर यानी दर्यापुर तालुका अध्यक्ष या नात्याने दर्यापुर तालुक्यातिल संपूर्ण 123 गाव खेड्या मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखा उघडुन मराठा समाजाच्या सर्वांगिन विकास करण्याचा प्रयत्न करून सामाजिक दायित्व पार पाडण्याचे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्रजी कोंढरे यांना दिले या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विनायकरावजी पवार अमरावती विभागीय अध्यक्ष श्री कृष्णाजी अंधारे अमरावती विभागीय उपाध्यक्ष श्री भैय्यासाहेब निचळ अमरावती महानगर अध्यक्ष श्री भानुदासजी बोदडे पाटिल अमरावती महानगर कार्याध्यक्ष श्री अण्णासाहेब धोटे अमरावती जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रजी ठाकरे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष श्री गणेशराव रेखे अमरावती जिल्हा महिला अध्यक्षा सौ छायाताई पाथरे उपस्थित होते