LIVE STREAM

AmravatiLatest NewsSports

आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात प्रविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार

अमरावती :- क्रीडा कौशल्य हाच सुदृढ आरोग्याचा व निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. अमरावतीमधील क्रीडा सेवांचा विस्तार , क्रीडा सुविधा  व मैदान विकास, विविध खेळांचे प्रशिक्षण व स्पर्धांचे आयोजन व या द्वारे अमरावतीचे  क्रीडा वैभव अधिक वृद्धिंगत  करण्यासाठी अमरावतीच्या आमदार- सौ . सुलभाताई संजय खोडके यांचा नेहमीच पुढाकार, मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. या शृंखलेत आता क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर अमरावतीचा लौकिक  वाढविणाऱ्या खेळाडू व क्रीडापटुंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने शनिवार दिनांक ०१ मार्च २०२५ रोजी अभियंता भवन येथे दुपारी ०४ वाजता करण्यात आले आहे.  या भव्य समारंभात  कबड्डीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त व्यक्तिमत्व जितेंद्रसिंह प्राणसिंह ठाकूर यांचा भारतीय कबड्डी फेडरेशनच्या महासचिव पदी निवड झाल्या बद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.


या नागरी सत्कार सोहळ्याला आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्यासह  शहराच्या क्रीडा क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व भाऊ  बेलसरे, शिवाभाऊ लड्ढा, डॉ. व्ही. एम. शर्मा तसेच निमंत्रित मान्यवर यांची  उपस्थिती राहणार आहे.


जितेंद्रसिंह ठाकूर हे भारतीय कब्बडी या खेळाला समर्पित असं व्यक्तिमत्व. मातीशी जुळलेल राहून मातीतील खेळाला आपलंस करून कबड्डीलाच जीवन समजणारा एक कबड्डीप्रेमी. शालेय जीवनापासून कबड्डीचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूने १९८६ पासून कबड्डीच्या लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखविली. वर्ष १९९० ते १९९५ च्या काळात समर्थ क्रीडा मंडळ बालाजी प्लॉट अमरावती.चा एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून नाव लौकिक मिळवून त्यांनी विविध स्पर्धा गाजविल्या.


याच काळात मंडळाचे अध्यक्षपदही भूषविलं. त्यावेळी अनेक व्यावसायिक खेळ व पाश्चिमात्य खेळाचे महत्व वाढत असतांना जितेंद्रसिंह ठाकूर यांनी कबड्डी सारख्या अस्सल मैदानी व मर्दानी खेळाला सर्वस्व मानून कबड्डीला गत वैभव मिळवून देण्याचा व अमरावतीच्या मातीतून उत्कृष्ट कबड्डीपटू घडविण्यासाठी पुढाकार घेतला.  कबड्डीप्रति समर्पित भावना ठेवून व वर्ष २००३-२००४ मध्ये अमरावती जिल्हा हौशी कबड्डी असोशिएशन चे सदस्य म्हणून नवीन इनिंग सुरु केली. याच दरम्यान समर्थ क्रीडा मंडळ, जागृती क्रीडा मंडळ, छत्रपती क्रीडा मंडळ, संत गाडगेबाबा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीच्या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. यांची हीच कामगिरी पाहून वर्ष २०१२ मध्ये त्यांची अमरावती जिल्हा हौशी कबड्डी असोशिएशनच्या अध्यक्ष पदी वर्णी लागली.  याच काळात विदर्भ स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने विदर्भ कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातूनही एक छाप निर्माण केली. नंतर वर्ष २०१३ पासून विदर्भ कबड्डी असोशिएशनच्या सदस्य म्ह्णून काम करीत वर्ष २०१८ पासून अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. दरम्यान विविध स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कब्बडीपटू घडविले. तर वर्ष २०१४ पासून विदर्भाचा कबड्डी चा संघ हा राष्ट्रीय स्तरावरच्या कब्बडी टुर्नामेंट मध्ये सहभागी होऊन आजपर्यंत प्रथम व द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरत आला आहे. तर त्यांच्या तालिमीत तयार झालेले कब्बडीपटूनी आज प्रो-कब्बडी सारख्या मोठ्या स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. कबड्डी या खेळाला समर्पित व यासाठी स्वतःला झोकून देऊन अहोरात्र काम करणारे जितेंद्रसिंह ठाकूर यांच्या  नेतृत्व क्षमता, कुशल मार्गदर्शन व संघ व्यवस्थापन अशा कार्यशैलीवर विश्वास दर्शवून आज त्यांची  अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२३ पासून  हि जबाबदारी सुद्धा  ते  मोठ्या निष्ठेने पार पाडत आहे.  जितेंद्रसिंह ठाकूर यांच्या  कबड्डी  क्षेत्रातील विशेष योगदान व कामगिरी बद्दल  अमरावतीचे नाव व लौकिक उंचावले असल्याने  अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येत आहे.


त्याचबरोबर नॅशनल  गेम  मध्ये मेडलिस्ट खेळाडू असलेले  कु.दीप्ती काळमेघ (जलतरण), कौस्तुभ गाडगे (वॉटर पोलो),यश दुबे (वॉटर पोलो), मानव जाधव (आर्चरी) ,पवन जाधव (आर्चरी),अभिजीत फिरके ( सॉफ्टबॉल), कु. मधुरा धामणगावकर (आर्चरी) ,कु. कुमकुम मोहोड (आर्चरी), गौरव चंदन (आर्चरी), कुमारी पूर्वशा शेंडे ( आर्चरी),  तर प्रशिक्षक मधून  प्रा.डॉ.योगेश निर्मळ ( जलतरण),अभिजीत इंगोले (सॉफ्ट बॉल),यांचा देखील समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तर श्री. संतोष अरोरा सर यांचा ५ लाख राष्ट्रीय ध्वजाच्या प्रतीकाचे गेल्या ३२ वर्षांपासून स्वखर्चाने  जिल्हा भर वाटप. करून  देशाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अमरावतीची क्रीडा प्रतिभा हाच अमरावतीचा अभिमान असल्याने या सत्कार सोहळ्याला  क्रीडाक्षेत्रातील सर्व आजी-माजी खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी, क्रीडा शिक्षक तसेच  क्रीडाप्रेमी व सर्व सहकार्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!