गो.से. महाविद्यालयातमराठी भाषा गौरव दिन संपन्न

बुलढाणा ,खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी व प्राध्यापकांच्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रफुल्ल उबाळे हे होते तर प्रा. म्हैसागर, प्रा. बी. एम. टकले, प्रा. विक्रम मोरे, प्रा. डी. एस. भुतेकर व प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख, प्रा. डॉ. डी टी आढाव हे प्राध्यापक प्रमुख कवी म्हणून उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले.व यावेळी ‘हुंडा विरोधी चळवळ मुंबई’ यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बुके देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. एस. भुतेकर यांनी केले व वर्षभरात होणारे मराठी भाषे संदर्भातील उपक्रम मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.पी. व्ही. उबाळे यांनी ‘कविता हे मानवाच्या भावना व्यक्त करण्याच्या अत्यंत सोपे व महत्त्वाचे माध्यम आहे.विद्यार्थ्यांनी या वयात भरपूर काव्यरचना करून आपल्या भावना त्यात मांडल्या पाहिजे’ अशा प्रकारे विद्यार्थ्यांना उदबोधित करून त्यांना कविता लिहिण्यास व सादरीकरणास प्रेरणा दिली त्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापकांच्या काव्य संमेलनास सुरुवात झाली.या काव्य संमेलनाचे संचालन मराठी विभागाचे प्राध्यापक विक्रम मोरे यांनी केले. तर प्रा. महिसागर यांनी प्रथम आपली ‘फुलला पळस’ ही स्वलिखित रचना सादर केली.त्या विद्यार्थी….. यांनी आपल्या रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.उबाळे यांनीही दोन मित्र,… त्यानंतर बी.एम. टकले यांनी ‘तिचा नकार’, ‘शेतकरी’ व ‘हे युग आहे कलीचे’या कविता सादर केल्या. प्रा. महेश वाघमारे यांनीही एक प्रेम काव्य गाऊन सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. ” तेच होते सोबतीला माझ्या, ज्यांनी मला छळले होते, अन् देवाच्या मंदीरात आधी, त्यांनीच फुले चढवले होते” प्रा. विक्रम मोरे यांनीअशी गझल सादर करून मानवाचा विरोधाभासी चेहरा आपल्या गझलरचने मधून व्यक्त केला. या काव्य संमेलनात महाविद्यालयातील काही कवी प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रा. डी. पी. गवई, प्रा. रवींद्र ढाकणे, प्रा.प्र दीप बानाईत, प्रा. डॉ. संकल्प कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच मोठ्या संख्येने सर्व शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. करण भारसाकडे यांने उपस्थितांचे आभार मानले.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.