AmravatiEducation NewsLatest News
म.न.पा उच्च प्राथमिक शाळा महादेव खोरी येथे मराठी राजभाषा दिन आनंदात साजरा
अमरावती :- म.न.पा उच्च प्राथमिक शाळा महादेव खोरी येथे मराठी राजभाषा दिन आनंदात साजरा. महादेवखोरी परिसरातील मनपा उच्च प्राथमिक शाळा महादेवखोरी येथे 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाची विशेषता म्हणजेच ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज वि.वा शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या लोकप्रिय कवितांचे गायन केले तसेच मराठी भाषेचा गौरव करणारी “माय मराठी तुझिया पायी तन-मन-धन मी वाहिले” ही कविता गायन केली. या उपक्रमाच्या यशाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बनसोड मॅडम तसेच शिक्षक स्टाफ कुमारी निशा चव्हाण, सचिन सराड, प्रज्ञा ढंगारे ,मनीषा बदुकले ,चित्रलेखा ननावरे तसेच घोरमाडे बाई यांनी परिश्रम घेतले.