रेशन कार्ड ई-केवायसी ची मुदत आज संपणार!

यवतमाळ :- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे राज्यभरात रेशन दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांनी अंतिम क्षणी केवायसी करण्यासाठी धावपळ सुरू केली असून, मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे.
राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. यापूर्वी सरकारने ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, संपूर्ण लाभार्थ्यांची केवायसी न झाल्याने ही मुदत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती.
मात्र, अद्याप अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने नागरिकांकडून मुदतवाढीची मागणी केली जात आहे. राज्यभरात रेशन दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. शासनाकडून यावर पुढील निर्णय अपेक्षित आहे.
रेशन कार्डधारकांसाठी ही महत्त्वाची माहिती! ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे ज्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी त्वरित ती पूर्ण करावी. यावर सरकार मुदतवाढ देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा city news