विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन
अमरावती :- जगामध्ये मोठ¬ा प्रमाणावर संशोधन सुरु आहे. मानवी जीवनाला सुकर करण्याकरीता समाज व देशाच्या विकासासाठी संशोधन महत्वाचे आहे. उदयोन्मुख संशोधकांनी संशोधन करतांना निरिक्षण करणे महत्वाचे असून त्या तथ्यांवर संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. किर्तीकुमार रणदिवे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद परिषद, डी.एस.टी., भारत सरकार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 फेब्राुवारी ते 5 मार्च, 2025 दरम्यान राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व एनएसडी – 2025 कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गजानन मुळे उपस्थित होते.
उद्घाटन झाल्याची घोषणा करुन डॉ. किर्तीकुमार रणदिवे पुढे म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात संशोधन महत्वाचे झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शोध लागलेत. या शोधाचा मानवी जीवन समृद्ध करण्याकरीता उपयोग व्हायला पाहिजे. 1940 पूर्वी अणुबॉम्बचा शोध सुद्धा लागला. मानवी समुदायावर संहार करण्यासाठी त्याचा गैरवापर झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्याथ्र्यांना आता नवनवीन कौशल्य मिळणार आहे, त्यामुळे रोजगार निर्मिती सुद्धा मोठ¬ा प्रमाणावर होणार असून विद्याथ्र्यांनी नवीन कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात करायला हवेत. आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष अंमलात आणता आला पाहिजे, हे शिक्षणातून आज अपेक्षित आहे.
राष्ट्र विकासासाठी शासनस्तरावर जलद प्रयत्न सुरु आहेत, त्यामध्ये विद्याथ्र्यांचा सहभाग सुद्धा महत्वाचा आहे. स्टार्टअप सुद्धा मोठ¬ा प्रमाणावर होत आहे. भविष्यात आमचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर सर्वात पुढे असेल, असे सांगून राष्ट्रीय विज्ञान दिवसामध्ये मोठ¬ा प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे, त्यामुळे संशोधनाची दिशा सुद्धा अद्ययावत होत आहे. दररोज होणारा तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेता भविष्यात तंत्रज्ञानामध्ये आणखी मोठे बदल होणार आहेत. विकासाकरीता अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा आज उपयोग होत आहे. मग ते बांधकाम क्षेत्र असो वा आरोग्य क्षेत्र. तंत्रज्ञानाचा संशोधनाचा उपयोग मानवी जीवनाकरीता होत असून कोरोनावर निघालेल्या लसीमुळे अनेक मनुष्याचे प्राण वाचू शकले. एन.एस.डी. निमित्ताने पाच दिवस विविध स्पर्धांचे आयोजन होणार असून त्यामध्ये विद्याथ्र्यांचा जास्तीतजास्त सहभाग अपेक्षित आहे. तसेच शिक्षकांनी सुद्धा मोठ¬ा प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा व भारतरत्न डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देवून डॉ. किर्तीकुमार रणदिवे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गजानन मुळे यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करुन पाच दिवस होणाया कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली तसेच पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संचालन प्रा. हर्षा देशमुख यांनी, तर आभार डॉ. कपिल कांबळे यांनी मानले.