शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरातील प्राचीन मूर्ती चोरीला

नागपुर :- नागपुरातील जुनी शुक्रवारी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरातून शतकानुशतके जुनी प्राचीन मूर्ती चोरीला गेली आहे. सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने जैन समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नागपुरातील श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना २८ फेब्रुवारीच्या पहाटे २.१० वाजता घडली असून, संपूर्ण चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अज्ञात चोरट्याने शतकानुशतके जुनी आणि अत्यंत महत्त्वाची ही मूर्ती मंदिरातून चोरी केली आहे. या घटनेमुळे जैन समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. पोलीस तपास वेगाने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि मंदिर प्रशासनाने धार्मिक स्थळांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात तस्करीच्या टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शीतलनाथ जैन मंदिरातील प्राचीन मूर्ती चोरीप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, लवकरच आरोपींना शोधून कारवाई केली जाईल, अशी आशा भाविक व्यक्त करत आहेत. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.