अ.भा. आंतर विद्यापीठ बॉलबॅडमिंटन (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती :- बंगळुरू नॉर्थ युनिव्हर्सिटी, कर्नाटक आयोजित न्यू हॉरिझन कॉलेज, मराथल्ली बंगळुरू येथे 14 ते 17 मार्च, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉलबॅडमिंटन (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगांव पूर्णाचा संकेत राखोंडे, भूषण गायगोले, सौरभ राखोंडे व स्वराज बरगट, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा धनंजय साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा पवन चुटे व यश रंगारी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा शंतनु मेहरे, वेदांत पवार व ऋषिकेश माथुरकर, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराचा ऋषिकेश तायडे व रुपेश ठाकरे, मानव स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोलाचा श्रेयस देशमुख, स्व. पी. पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोडचा क्रिश जयस्वाल, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा ऋषिकेश सातव यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 02 ते 11 मार्च दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल