LIVE STREAM

Crime NewsLatest News

कोर्टातच सरकारी वकील लाच घेताना अटकेत

बुलढाणा :- एका गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईल, या पद्धतीने न्यायालयासमोर बाजू मांडण्याकरिता तक्रारकर्त्याकडून एक लाखाची लाच घेताना मेहकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील जे. एम. बोदडे यांना शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मेहकरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये ही कारवाई केली.

डोणगाव पोलिस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. मेहकरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. आरोपीला दाखल गुन्ह्यात शिक्षा होण्याकरिता न्यायालयासमोर बाजू मांडण्यासाठी सहायक सरकारी वकील जनार्दन मनोहर बोदडे (६१) यांनी या घटनेतील कैफियतदारास तीन लाख रुपयांची लाच मागितली. याविषयी २४ फेब्रुवारीलाच वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्याच दिवशी पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली. तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये २८ फेब्रुवारीला द्यावेत, असे ठरले होते.

एसीबीचे अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम एसीबीचे पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, विनोद मार्कंडे, आसिफ शेख, योगेश खोटे, रवींद्र घरत, मिलिंद चन्नकेशला यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. पडताळणीत संमती दर्शविताच न्यायालयात सापळा रचण्यात आला. एक लाख रुपये घेताच बोदडे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!