गौरी इन समोरील बायपासवर भीषण अपघात! माजी पालकमंत्र्यांच्या वाहनातील गूढ रहस्य उघडकीस येणार का?

अमरावती :- शुक्रवारी मध्यरात्री अमरावतीच्या बायपास रस्त्यावर एक भयानक अपघात झाला.पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार भरधाव वेगाने पलटी झाली! मात्र, या अपघातापेक्षा जास्त चर्चा होतेय या कारमधील गूढ रहस्यांची!ही गाडी होती एका मोठ्या राजकीय नेत्याच्या नावावर! अपघाताच्या ठिकाणी कारच्या दोन्ही नंबर प्लेट्स अचानक गायब कश्या होतात? चालकासोबत आणखी कोणी होतं? एका युवतीच्या जखमी होण्याच्या चर्चा!आणि दारूच्या नशेत गाडी चालवली गेली का?सिटी न्यूजने या अपघाताची सखोल चौकशी केली. यामागे दडलेलं खरं सत्य काय आहे? या गाडीत आणखी कोण होतं? पोलिसांनी काय कारवाई केली?
पाहूया हा एक धक्कादायक रिपोर्ट…
मध्यरात्रीचा काळोखा आणि एक भीषण अपघात! गौरी इन ते बंद टोलनाक्याजवळ एका फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला. MH 27 AC 0022 क्रमांकाच्या या गाडीने रस्त्याच्या कडेला पलट्या घेतल्या. वेग एवढा जबरदस्त होता की…? गाडीचा अतोनात चुराडा झाला. एअर बॅग्ज फुटल्या! गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. गाडी चालवणारा आलेख नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत सापडला. मात्र, त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का? हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे!
गूढ वाढलं! कारच्या दोन्ही नंबर प्लेट्स कुठे गेल्या? शनिवारी सकाळी सिटी न्यूजच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली. मात्र, एक धक्कादायक गोष्ट समोर आली गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट्स अचानक गायब होत्या! कोणी मुद्दामहून नंबर प्लेट्स काढल्या का? गाडी कोणाच्या मालकीची आहे हे लपवण्याचा प्रयत्न? यामुळे या अपघाताचे रहस्य अधिकच गडद होत आहे! अपघातात युवतीचा समावेश? ‘दुसऱ्या’ व्यक्तीचे रहस्य गुलदस्त्यात!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका युवतीलाही गंभीर दुखापत झाली आहे! मात्र, तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि याची अधिकृत नोंदही झाली नाही! पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी का केली नाही? आणि ही युवती कोण? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फॉर्च्युनर एका क्लबमधून दारू पिऊन बाहेर पडली आणि काही अंतरावर अपघात झाला! मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी आहे माजी एका पालकमंत्र्यांच्या नावावर! बड्या नेत्यांच्या नावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय का? पोलिसांनी फक्त ‘अपघात नोंद’ करून केस मिटवली का?
हा अपघात की काहीतरी मोठं गूढ?
या गाडीत नेमकं कोण होतं?
युवती जखमी झाली असेल तर याची अधिकृत नोंद का नाही?
गाडीच्या नंबर प्लेट्स कोणी गायब केल्या?
माजी पालकमंत्र्यांच्या नावामुळे प्रकरण दडपले जात आहे का?
पोलिस या अपघाताचे सत्य बाहेर आणणार का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत! गाडगेनगर पोलिसांकडून याचा योग्य तपास केला जाईल का?
या प्रकरणाचा पर्दाफाश होईल की हे गूढ कायमच गुलदस्त्यात राहील?