जिल्हा परिषद शाळा अळनगावमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

भातकुली :- भातकुली तालुक्यातील अळनगाव जिल्हा परिषद शाळेत पार पडलेल्या बाल आनंद मेळाव्याचा खास रिपोर्ट. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा आणि त्यांना व्यावहारिक शिक्षण देणारा हा उपक्रम कसा पार पडला
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील अळनगाव जिल्हा परिषद शाळेत आज बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. यात कचोरी, समोसा, भेळ, भजे, मसाला पापड यांसारख्या पदार्थांची विक्री करून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार, नफा-तोटा समजावून देणे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे हा होता. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्यांचे आनंदी चेहरे पाहून शिक्षक आणि पालकही खुश झाले.
तर अशा या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. शाळा आणि शिक्षकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे निश्चितच कौतुक करायला हवे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा City News.