तुर खरेदी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी! जिल्ह्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी २४ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असून, ८ खरेदी केंद्रांवर प्रक्रिया सुरू आहे. काय आहे संपूर्ण माहिती?
पाहूया हा खास रिपोर्ट…
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! नाफेडच्या माध्यमातून आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीस २४ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी नोंदणीची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी होती, मात्र आता शेतकऱ्यांना आणखी ३० दिवसांची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील ८ खरेदी केंद्रांवर प्रक्रिया सुरू असून, १३ फेब्रुवारी ते १३ मे २०२५ दरम्यान प्रत्यक्ष खरेदी करण्यात येईल. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती संबंधित खरेदी केंद्रावर जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.
तर शेतकरी बंधूंनो, शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घ्या आणि त्वरित ऑनलाईन नोंदणी करून आपले हक्काचे उत्पन्न सुरक्षित करा. तुर खरेदी प्रक्रिया १३ मेपर्यंत सुरू राहणार असून, अधिक माहितीसाठी नजीकच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधावा.