नागपुरात क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी धाड!

नागपूर :- नागपूर शहरात क्रिकेट सट्टा बेटिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मानकापूरच्या सागर अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट..
नागपूर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने मानकापूर ताजनगर येथील सागर अपार्टमेंटमध्ये धाड टाकली. चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट लीगमध्ये सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत प्रमोद डोंगरे, संदीप देवगडे आणि अजमत खान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून ८ मोबाईल, २ लॅपटॉप आणि १ टीव्ही असा एकूण २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस तपासात या तिघांनी यवतमाळ येथील जयस्वाल याच्यासाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे जयस्वालचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
Bite – शुभांगी देशमुख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २, नागपूर
“आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही कारवाई केली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.
तर नागपुरात क्रिकेट सट्ट्यावर मोठी कारवाई झाली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी जयस्वालच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या प्रकरणावर आम्ही आणखी अपडेट्स देत राहू. पाहत राहा City News.