नागपूर बोगस दवाखाना प्रकरण – मोठा खुलासा!

नागपूर :- डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेल्या भावाने सुरू केला बोगस दवाखाना! नागपूरच्या अन्सारनगरमध्ये या बोगस क्लिनिकवर पोलिसांची आणि महानगरपालिकेची संयुक्त कारवाई. काय आहे नेमकं हे प्रकरण? पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये
डॉ. साजिद अन्सारी यांच्या निधनानंतर त्यांचा 23 वर्षीय मुलगा जैद अन्सारी हे कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतानाही क्लिनिक चालवत होता. या ठिकाणी रुग्णांवर उपचार, इंजेक्शन, औषधं देण्यासह मध्यपी मशीनचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब उघड केल्यानंतर तहसील पोलिसांनी कारवाई करत बोगस दवाखाना सील केला आहे. आता या प्रकरणात आणखी कोण सामील आहेत याचा तपास सुरू आहे.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे. वैद्यकीय शिक्षणाशिवाय चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नागपूरच्या या प्रकरणानंतर प्रशासन आणखी काही ठिकाणी कारवाई करणार का? पुढील तपास काय सांगतो, यावर आमची नजर राहील.