नागपूर सुरक्षा विभाग पोलिसांना देहव्यापार सुरू असल्याची मिळाली गुप्त माहिती.

नागपूर :- नागपुरात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश! सुरक्षा विभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठी माहिती समोर आली आहे. बंटी उर्फ आकाश आणि सचिन मेश्राम या दोघांनी मिळून महिलांना खोलीत आणून वेश्याव्यवसाय चालवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चला, सविस्तर माहिती घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये.
नागपूर सुरक्षा विभाग पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शहरातील दोन ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बंटी उर्फ आकाश, सचिन मेश्राम आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.
बंटी हा त्याच्या मित्राच्या खोलीत बाहेरून महिलांना बोलवून हा अवैध धंदा चालवत होता. पोलिसांनी काही पीडित महिलांची सुटका केली असून त्यातील एक महिला कोलकातामधील असल्याचे समोर आले आहे.
सचिन मेश्राम याने एक महिन्यापूर्वीच ही खोली विकत घेतली होती. तपासादरम्यान पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती मिळाली आहे की शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू होता. कोलकाताहून आणलेल्या पीडितेची पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
तर नागपुरात या प्रकारामुळे खळबळ माजली असून पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा अवैध धंदा उघडकीस आला आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.