पाण्यासाठी लढा! अप्पर वर्धा वसाहतीत पाणीटंचाई, प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक संतापले!

पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे, आणि ती मिळाली नाही तर काय होईल? नागपूरच्या अप्पर वर्धा वसाहतीतील नागरिकांवर प्रशासनाने पाण्यासारखा गंभीर अन्याय केला आहे. तब्बल काही दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद असून, संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे! आजच्या खास रिपोर्टमध्ये पाहूया, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक कशा अडचणींना सामोरे जात आहेत.
अप्पर वर्धा वसाहतीत तीन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत, मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक एका विशिष्ट भागातील टाकीचा पुरवठा थांबवला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे जाब विचारला असता त्यांना थेट पाणीबिल भरण्याची अट घातली गेली. नागरिकांनी 80 हजार रुपये गोळा करून बिल भरण्याचा प्रयत्न केला, पण धक्कादायक म्हणजे प्रशासनाने ती रक्कम स्वीकारायलाच नकार दिला!
या वसाहतीत गर्भवती महिला, लहान मुले, वयोवृद्ध, दिव्यांग नागरिक राहतात. या लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने पाणीपुरवठा त्वरित सुरू करायला हवा होता, पण तसे झाले नाही. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे!
पाणी म्हणजे जीवन आहे. आम्ही पैसे भरायची तयारी दाखवली, तरीही प्रशासन ऐकायला तयार नाही. आमच्या घरातील बाळं, वयोवृद्ध, महिला तडफडत आहेत! जर लवकरच पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू!” अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश नागले यांनी सिटी न्यूज शी बोलतांना दिली आहे .
संतप्त नागरिकांना न्याय मिळेल का? प्रशासन लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करेल का? हा लढा आणखी तीव्र होईल का?
याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा.