बेलोरा व्यापारी संकुलात धाडसी चोरी – एका रात्रीत १० गोदाम फोडली!
अमरावती :- अकोला महामार्गावर बेलोरा एअरपोर्टजवळील व्यापारी संकुलात एका धाडसी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडवली आहे. एका रात्रीत तब्बल १० गोदामं फोडली गेली, त्यापैकी ३ गोदामांमध्ये चोरी झाली आणि जवळपास ४.७० लाख रुपयांचे धान्य अज्ञात चोरांनी लंपास केले आहे. चला, पाहूया हा संपूर्ण अहवाल.
लोणी पोलिस ठाणे हद्दीतील अमरावती-अकोला महामार्गावर बेलोरा एअरपोर्टजवळील व्यापारी संकुलात २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली. चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल १० गोदाम फोडली, मात्र त्यातील केवळ दोन गोदामांतून चोरी करण्यात त्यांना यश आले. या दोन गोदामांतून एकूण ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे धान्य चोरीस गेल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे थानेदार सतीश खेडेकर यांनी तातडीने तीन पथके तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
बेलोरा एअरपोर्टजवळील या व्यापारी संकुलात शहरातील व्यापारी आपले धान्य आणि इतर वस्तू साठवतात. याठिकाणी १० हून अधिक गोदामे आहेत. चोरट्यांनी याच गोदामांवर हल्ला चढवत मोठी चोरी केली. या घटनेत व्यापारी वीरेंद्र जैन यांच्या गोदामातून ३८ क्विंटल सोयाबीन आणि पवनकुमार अग्रवाल यांच्या गोदामातून ५० क्विंटल तांदूळ चोरीला गेला.
या संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांना चोरी करणे सोपे गेले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली असून, व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
थानेदार सतीश खेडेकर यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली असून तातडीने तीन पथके तयार करून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही याच भागात मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या गोदामात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले आहे.
बेलोरा व्यापारी संकुलातील ही चोरी व्यापारी वर्गासाठी मोठा धक्का आहे. पोलिसांची तपास यंत्रणा कार्यरत झाली असली तरी, व्यापाऱ्यांनी देखील स्वतःची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्याची गरज आहे. या प्रकरणात पुढील काय घडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा! City News