वाठोडा पोलिसांनी जप्त केला लाखो रुपये किमतीचा एमडी

नागपूर :- नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी आणि मोबाईलसह एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपुरातील वाठोडा पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपये किमतीचा एमडी ड्रग्स जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम गजभिये याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून २५ ग्रॅम एमडी, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही अंमली पदार्थ संबंधित माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल, असे वाठोडा पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
वाठोडा पोलिसांची ही मोठी कारवाई निश्चितच महत्त्वाची असून, अमली पदार्थांचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. जर तुम्हाला कुठेही अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री अथवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास, त्वरित पोलिसांना कळवा. City News मध्ये आज इतकेच, पुढील अपडेटसाठी पाहत रहा City News!