विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप
अमरावती :- मनुष्यबळाची चिंता सर्वांनाच आहे, परंतु अशाही परिस्थितीत विद्यापीठाच्या कर्मचा-यांनी समर्पण भावनेने सेवा दिली, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्य. प. सदस्य डॉ. अविनाश बोर्डे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी डॉ. नितीन कोळी, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, सहा. कुलसचिव सारणी श्री अनिल काळबांडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती श्री श्रीराम ढोले, सौ. ढोले, श्री किरण भोरे, सौ. भोरे, एस.एन. राऊत, सौ. राऊत यांची उपस्थिती होती.
कर्मचारी निवृत्त होत असतांना निश्चितच उणीव जाणवते, मात्र आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मनुष्यबळाची समस्या निश्चितच मार्गी लागेल, असा वि·ाासही प्र-कुलगुरू डॉ. ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचा कर्मचा-यांना शुभेच्छापर संदेशही त्यांनी यावेळी व्यक्त करुन सत्कारमूर्तींना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी श्री श्रीराम ढोले, श्री किरण भोरे, श्री एस.एन.राऊत यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवप्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तर सौ. ढोले यांचा सौ. मोनाली तोटे पाटील, सौ. भोरे यांचा सौ. रजनी चपाटे, सौ. राऊत यांचा सौ. मंगला देशमुख यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. अविनाश बोर्डे म्हणाले, संत गाडगे बाबांनी खराट¬ाच्या माध्यमातून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजेरीच्या माध्यमातून तर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी खडूच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केली. काय घेतले, यापेक्षा काय दिले यातच कर्मचा-यांना आऩंद दिसतो, त्यामुळे सेवेतून निवृत्त होत असले, तरी मनाने निवृत्त होऊ नये. मानवी संसाधने कमी असतांनाही विद्यापीठाची विचारधारा आजही कर्मचा-यांनी जीवंत ठेवली असून यामुळेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे वेगळेपण आहे, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी सत्कारमूर्ती सर्वश्री श्रीराम ढोले, किरण भोरे, एस.एन. राऊत यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नियंत्रण अधिकारी डॉ. दिलीप काळे, डॉ. नितीन कोळी, श्री अनिल काळबांडे, श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने कोषाध्यक्ष श्री राजेश एडले, उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, सदस्य डॉ. नितीन कोळी, श्री चंद्रशेखर लोखंडे यांनी सत्कारमूर्तींचा सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार भांडार विभागाचे अधीक्षक श्री धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.