LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

१५ सेकंद काफी हैं! हिंदू शेरणी नवनीत राणा विरुद्ध ओवैसी प्रकरण

प्रचारादरम्यान ओवैसी यांनी हिंदूंना १५ मिनिटं मागितली होती, आणि याच विधानाला प्रत्युत्तर देत हिंदू शेरणी नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं – १५ मिनिटं नाही, १५ सेकंद काफी हैं!” आज हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे! ओवैसींनी कोर्टात धाव घेत नवनीत राणा यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली असून, ६ मे २०२५ रोजी हैदराबाद न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे!”

“या प्रकरणात नवनीत राणा यांचे वकील अ‍ॅड. अवनीश रेड्डी आणि अ‍ॅड. दिलीप कुमार यांनी जोरदार युक्तिवाद करत नवनीत राणा यांची बाजू मांडली. आता हिंदू शेरणी नवनीत राणा कोर्टात काय उत्तर देणार? देशभरातील हिंदू समाज हा निकाल कसा लागतो याकडे डोळे लावून बसला आहे!

हा सारा वाद सुरू झाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, जेव्हा हैदराबादमध्ये ओवैसी यांनी वादग्रस्त विधान करत हिंदूंना १५ मिनिटं मागण्याची भाषा केली. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत, नवनीत राणा यांनी ‘१५ मिनिटं नाही, मला फक्त १५ सेकंदच लागतील’ असे म्हणत संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं!
ओवैसी यांच्या आरोपांनंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले असून, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नवनीत राणा यांना न्यायालयाने समन्स बजावले.न्यायालयात सुनावणी दरम्यान, अ‍ॅड. अवनीश रेड्डी आणि अ‍ॅड. दिलीप कुमार यांनी नवनीत राणा यांची बाजू ठामपणे मांडली. आता पुढील सुनावणी ६ मे २०२५ रोजी होणार आहे!

हिंदू शेरणी नवनीत राणा यांचे बोलणे अनेकांना नडत आहे! पण प्रश्न असा आहे – १५ मिनिटं मागणाऱ्यांचं काही चुकत नाही, पण प्रत्युत्तर देणाऱ्यांवरच कारवाई का?” “ही फक्त न्यायालयातील लढाई नाही, ही विचारसरणीची लढाई आहे! नवनीत राणा ६ मे २०२५ रोजी कोर्टात काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे!” सिटी न्यूजचा सवाल – लोकशाहीत प्रत्युत्तर द्यायला बंदी का? न्यायालय काय निर्णय देणार?

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!