SDF English School आणि JR College तर्फे वाहतूक जनजागृती अभियान

अमरावती :- वाहतूक नियमांचे पालन आपले आणि इतरांचे प्राण वाचवू शकते! याच संदेशाचा प्रचार करण्यासाठी अमरावतीत आज विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाला वाहतूक पोलिसांनीही पाठिंबा दिला.
पाहुया ही खास बातमी…
शनिवार, 1 मार्च रोजी अमरावतीतील पंचवटी चौकात SDF इंग्लिश स्कूल आणि JR कॉलेज यांच्या वतीने वाहतूक नियम जनजागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत हेल्मेट वापरण्याचे, वाहने हळू चालविण्याचे आणि सिग्नलचे पालन करण्याचे आवाहन केले. ‘हेल्मेट वापरा, प्राण वाचवा’ अशा संदेशफलकांसह विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमाला वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार खरोखरच प्रेरणादायी आहे. शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशा उपक्रमांमधून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा City News!