अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्येष्ठ कर्मचारी अंबादास पाथरकर यांची सेवानिवृत्ती

अकोला :- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एक खास कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ कर्मचारी श्री. अंबादास पाथरकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बाजार समितीतील समस्त कामगार, व्यापारी व संचालक मंडळाने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सस्नेह निरोप दिला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
चला,याबाबत सविस्तर पाहूया आमच्या या खास रिपोर्टमध्ये…
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी अंबादास पाथरकर यांची सेवापूर्ती निमित्त बाजार समितीतील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार व सस्नेह निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर महल्ले, संचालक . भरत काळमेघ चंद्रशेखर खेडकर, संचालक चंदु चौधरी, तसेच सचिव सुनिल मालोकार आणि व्यापारी . महेश मुंदड़ा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी कामगारांच्या वतीने हुसेन बेनिवाले, रशीद चौधरी, बुऱ्हाण बेनिवाले, हसन लंगे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पाथरकर साहेबांचा सत्कार केला. तसेच अकोला जनरल श्रमिक संघाचे सचिव निरज जगताप, महेंद्र ओवाळ, अरुणाबाई जामने, आशाबाई अवचार यांनीही पुष्पहार व शाल देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी चौखंडे, वासुदेव सोनोने, सागर काळे, ऊन्हाळे, विशाल चोपडे, सेवानिवृत्त राजू सांगळे, प्रविण कांगटे, पालखेडे, कराळे, सेवानिवृत्त अनिस खान यांनी विशेष सहकार्य केले.
या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संचालक चंदु चौधरी, अजय वाहुरवाघ, प्रविण थोरात, मो. जुनैद गौरवे, जावेद चौधरी, चाँद चौधरी, बुर्हान बेनिवाले, सलीम चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
अंबादास पाथरकर यांनी आपल्या कार्यकाळात बाजार समितीसाठी मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित या सत्कार समारंभाने एक भावनिक वातावरण निर्माण केले. बाजार समितीतील कर्मचारी, संचालक आणि व्यापाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत सन्मानित केले.