काम देण्याच्या बहाण्याने १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार! – भुसावळ हादरलं

भुसावळ :- माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना! भुसावळ शहरात कामाच्या शोधात आलेल्या १८ वर्षीय तरुणीची फसवणूक करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकारानं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. समाजात आजही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढतंय, पण कुठे आहे न्याय? आणि कोण जबाबदार आहे या सर्व प्रकाराला? पाहूया आमचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट!
१ मार्च २०२५ च्या मध्यरात्री बेंबळा गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ३१ वर्षीय तरुण शेतकरी स्वप्निल प्रल्हाद चौधरी याने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. स्वप्निलच्या आईने रोजच्याप्रमाणे त्याच्या कामावर जाण्यासाठी डबा तयार केला. मात्र, स्वप्निल उठला नाही. त्यावेळी आईने त्याला आवाज दिला, पण प्रतिसाद न मिळाल्याने तिने खोलीत पाहिले. तिथे जे दृश्य दिसले, त्याने कुटुंब हादरले! स्वप्निलने खिडकीला दोरी लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वप्निलच्या कुटुंबावर मोठे कर्ज होते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यातच फायनान्स कंपनीच्या सततच्या दबावामुळे तो मानसिक तणावात होता. हा तणाव इतका वाढला की त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मागे आई, लहान भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार उघड्यावर पडला आहे. त्यांच्या डोळ्यात केवळ आसवे आणि हतबलता आहे!
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा हे सत्र अजून किती दिवस चालणार? सरकारी कर्जमाफीच्या घोषणांचे काय झाले? फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीमुळे आणखी किती कुटुंबे उघड्यावर पडणार? आजही शेतकरी आत्महत्या करतोय आणि सरकार केवळ घोषणा देतंय! ही वेळ केवळ दुःख उघडं करण्याची नाही, तर शासनाने आता कठोर पावले उचलण्याची आहे. अन्यथा, आणखी किती स्वप्निल चौधरींना आपले प्राण गमवावे लागतील, याचा नेम नाही! या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.