तिवसा तालुक्यातील मोझरी बसस्थानक बनले आंबट शौकीनांचा अड्डा!

तिवसा :- तिवसा तालुक्यातील मोझरी बसस्थानकावर घाणेरड्या आणि अस्वच्छतेचे दृश्य पाहून तुम्हाला धक्का बसेल! कंडोमचा सडा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, आणि असुरक्षित वातावरण यामुळे हे बसस्थानक आंबट शौकीनांचा अड्डा बनले आहे! सर्वसामान्य प्रवाशांचे आणि विशेषतः महिलांचे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की, पोलीस स्टेशन आणि सुरक्षा यंत्रणा असतानाही अशा प्रकारच्या घटनांना आळा का घातला जात नाही?
तिवसा तालुक्यातील मोझरी बसस्थानक हे प्रवाशांसाठी असावे, पण येथे दिसतेय काहीतरी वेगळेच! बसस्थानकाच्या परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या, कंडोमचा सडा, आणि अघोरी प्रकार पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या बसस्थानकाच्या अगदी शेजारीच मोझरी पोलीस स्टेशन आहे, पण तरीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
महामार्गालगत हे बसस्थानक असूनही येथे सुरक्षेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी येथे येणाऱ्या महिला प्रवाशांसाठी धोक्याची स्थिती आहे. एसटी महामंडळाचे सुरक्षा रक्षक असूनही अशा घटनांना आळा का घातला जात नाही? हा मोठा प्रश्न आहे.
स्थानिक नागरिकांनी यावर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. पोलिस प्रशासन आणि एसटी महामंडळ यांना यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा, मोझरी बसस्थानक प्रवाशांसाठी धोक्याचे ठरणार आहे!
मोझरी बसस्थानकावर सुरू असलेल्या या प्रकारांवर कोण कारवाई करणार? पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ यांची जबाबदारी काय? महिलांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशासनाने या प्रकारांवर तातडीने पावले उचलली नाहीत, तर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागेल. आमच्या City News च्या टीमकडून यावर लक्ष राहील आणि आम्ही पुढील अपडेट्स तुम्हाला देत राहू.