LIVE STREAM

Accident NewsLatest News

प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस, वाटेत अचानक घेतला पेट

अकोला :- अकोला अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अकोल्यातल्या अकोट पोपटखेड रस्त्यावर ही घटना घडली. आगीमध्ये बस जळून खाक झाली. या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अकोल्यात धावत्या एसटी बसने अचानक अचानक पेट घेतला. शहानुर- अकोल अशी एसटी महामंडळाची ही बस आहे. आज सकाळीच शहानुर इथून बस अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली होती. पोपटखेड वरून अकोटकडे जात असतानाच याच मार्गावरील बोर्डी फाट्यावर अचानक बसमधून धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. बघता बघता बसने मोठा पेट घेतला.

आगीमुळे बस पूर्णत: जळून खाक झाली. प्रवाशांच्या वस्तू तसेच एसटी बसचे आगीत मोठे नुकसान झालं. सुदैवाने सर्व बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत. बस चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते असे सांगण्यात येत आहे. या सर्वांचे प्राण वाचले. बसमधील सर्व खुर्च्या आणि इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाले. आगीची माहिती आकोटच्या अग्निशमन दलाला देण्यात आली . मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत पूर्ण बस आगीच्या तावडीत आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झालं.

एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अकोला जिल्ह्यातीलच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानुरवरून पहाटेच ही बस अकोटकडे निघाली होती. मात्र वाटेतच बोर्डी फाट्याजवळ बसला अचानक आग लागली. परंतू बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!