बस रस्ता चुकली, दुसऱ्या बसने उडवले, ३७ जणांचा जागीच मृत्यू, ३९ गंभीर जखमी

बोलीव्हिया :- बोलीव्हिया येथे झालेल्या भीषण अपघातात ३७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस चुकीच्या लेनमधून जात होती, त्यावेळी समोर आलेल्य बसने जोरदार धडक दिली. त्यामळे भीषण अपघात झाला अन् जागेवरच ३७ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ३९ जण जखमी झाले आहेत, त्यामधील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोलीव्हिया येथील पोटोसी परिसरात बसचा भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला, तर ३९ जण जखमी आहेत. अपगाताची माहिती मिळताच पलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामधील जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल जजीराने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बसचा ही भीषण अपघात स्थानिक वेळेनुसार, शनिवारी सकाळी सात वाजता झाला. उयूनी आणि कोलचानी यादरम्यान दोन बसची जोरदार धडक झाली. अल जजीराने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, उयूनी सालार येथील प्रवेशद्वार अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. दररोज हजारो पर्यटक भेट देतात. पर्यटनासाठी आलेली बसने जोरदार धडक दिली, त्यामुळे भीषण अपघाताची घटना घडली.
या भीषण अपघातामध्ये ३९ जणांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यामधील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ३९ रूग्णांवर चार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.