बायकोनं भाजी केली नाही, नवऱ्याच डोकं सटकलं, कुऱ्हाडीने तुकडे केले अन् पोलिसांत गेला

बिहार :- बायकोनं स्वयंपाक करताना भाजी केली नाही, म्हणून संतापलेल्या नवऱ्याने कुऱ्हाडीने सपासप वार करत जीव घेतला. बिहारमधील किशनगंज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी नवऱ्याने कुऱ्हाडीने बायकोचा जीव घेतल्यानंतर स्वत: पोलिसांत पोहचला अन् गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
बायकोने जेवणात भाजी केली नाही, त्यामुळे नवऱ्याने जीव घेतल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. मृत महिलेला ४ मुलं होती. किशनगंजमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् एकच खळबळ उडाली. तारा बाडी ग्रामपंचायत परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच गंदर्भा डांगा पोलीस घटनेस्थळी पोहचले अन् कारवाईला सुरूवात केली. मृत महिलेचं नाव रूबी बेगम आहे, तिला चार मुलं होती. रूबीच्या मृत्यूमुळे चार मुले पोरकी झाली आहेत. रूबी बेगम हिचा मृतदेह घराच्या अंगणात तिच्या दीराने पाहिला अन् पायाखालची वाळूच सरकली. त्याने गावातील लोकांना याबाबत माहिती देत पोलिसांना पाचारण केले.
कौटुंबिक वादातून अब्दुस शकूर यानेच आपल्या पत्नीला मारल्याचे त्याने सांगितले. नवरा-बायकोमध्ये वारंवार वाद होत होता. कोणत्याही क्षुल्लक कारणांमुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होत होते. गुरुवारी रात्रीही दोघांमध्ये जोरात वद झाला. रागाच्या भरात नवऱ्याने कुऱ्हाडीने बायकोची निर्घृण हत्या केली. आरोपीने रागाच्या भरात पत्नीवर सपासप वार केले, त्यामुळे जागेवरच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो पोलिसांत पोहचला.
नवऱ्याने जेवणात भाजी मागितली होती, पण घरात भाजी नव्हती, त्यामुळे रूबीने तयार केली नाही. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने रूबीचा खून केला, असे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले. दोघांमध्ये २० वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यांना ४ मुलं होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत होता. संतापलेल्या नवऱ्याने कुऱ्हाडीने वार करत बायकोचा जीव घेतला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.