विदर्भस्तरीय महाशिवरात्री पूजेला हजारो भाविकांची उपस्थिती – सहजयोग ध्यान केंद्राचा आध्यात्मिक सोहळा

शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे अनंत कृपा, आणि या शिवतत्त्वाची उपासना करण्यासाठी विदर्भातील हजारो भक्तांनी एकत्र येत महाशिवरात्रीचा भव्य सोहळा साजरा केला. एच.एच. श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्टच्या वतीने विदर्भस्तरीय महाशिवरात्रि पूजेचे आयोजन अमरावतीतील सहस्त्रोत निर्मल धाम येथे करण्यात आले होते. भक्ती आणि आध्यात्मिक उर्जेने भारावलेल्या या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत पाहुयात.
परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी सहजयोग ध्यान केंद्राची स्थापना केली आणि या ध्यानमार्गाने आज जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. सहजयोगाची ही चळवळ 100 हून अधिक देशांमध्ये पोहोचली असून लाखो साधक या ध्यान पद्धतीचा लाभ घेत आहेत. विदर्भातील प्रत्येक तालुक्यात सहजयोग केंद्र स्थापन करण्यात आले असून, हजारो नागरिकांनी या मार्गाने जीवनात परिवर्तन अनुभवले आहे.
महाशिवरात्रि ही केवळ एक पूजा नसून, ती आत्मशुद्धीचा एक सोहळा आहे. सहजयोगाच्या माध्यमातून आम्ही ध्यानधारणेद्वारे परमात्म्याशी जोडतो आहोत आणि याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे.
या भव्य पूजेसाठी हजारोच्या संख्येने भाविकांनी सहस्त्रोत निर्मल धाम येथे हजेरी लावली. ध्यान, भजन, आणि मंत्रोच्चाराच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता. संपूर्ण भारतभर 60 हून अधिक ठिकाणी या पूजेचे आयोजन करण्यात आले असून, अमरावतीमधील हा सोहळा विशेष भव्य स्वरूपात पार पडला.
महाशिवरात्री ही केवळ उपवासाची किंवा पूजेची परंपरा नसून, ती आपल्या आत्मशुद्धीचा एक दिव्य योग आहे. सहजयोगाच्या माध्यमातून लाखो लोकांनी त्यांचे जीवन समृद्ध केले असून, या पूजेद्वारे त्यांनी शिवतत्त्वाची अनुभूती घेतली. अशाच अध्यात्मिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी बघत राहा सिटी न्यूज.