Crime NewsLatest NewsVidarbh Samachar
31 वर्षे युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या

वाशिम,कारंजा लाड :- सतत शेतीच्या नापिकीमुळे. फायनान्स कंपनीचे लोन सक्तीने वसूल करत असल्यामुळे 31 वर्षे युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या. कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा येथे. स्वप्निल प्रल्हाद चौधरी हा 31 वर्ष तरुण 1 मार्च 2025 मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहा वाजता लक्षात आली. मृत व्यक्ती स्वप्नील त्याच्यावर काम करीत जाण्यासाठी आई स्वयंपाकाचा डबा तयार करीत होती. अचानक मुलगा काल लवकर उठला नाही असे लक्षात आले. त्यावेळी आईने आरडा ओरड केली. पाहतो तर खिडकीतून स्वप्निल चौधरी या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दिसून आले संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल चौधरी हा मोठा मुलगा असल्यामुळे कुटुंबाचे वझे त्यावरच होते. मागे लहान भाऊ आई पत्नी एक मुलगा आणि मुलगी एवढा कुटुंब आहे.