पुण्यात पोलिसावरच जीवघेणा हल्ला, गोळीबार अन् कोयत्याने वार

पुणे :- शिवशाही बलात्कार प्रकरणामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यातच आता पुण्यात पोलिसच सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. चाकणमध्ये पोलिसांवरच हल्ला केलाय. गोळीबार अन् कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लायमध्ये डीसीपी शिवाजी पवार यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
चाकण जवळील बहुळ गावात चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. DCP शिवाजी पवार यांच्यासह पोलीस कर्मचा-यावर गोळीबार करण्यात आला, यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीसांकडून प्रति हल्ल्याचा गोळीबार करण्यात आला, यामध्ये गोळीबार करणा-या चोरट्याच्या पायाला गोळी लागली आहे. चोरट्यांच्या हातातल्या पिस्तुल आता पोलिसांवर रोखल्या जाऊ लागल्याने चाकण परिसरात चोरट्यांची दहशत वाढतेय का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत काल रात्री 12:15 च्या सुमारास बहुळ गावच्या दरोडा प्रकरणातील आरोपी सचिन चंदर भोसले याला सापळा लावून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्यात पोलिस उप आयुक्त शिवाजी पवार, पोलिस उप निरीक्षक हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोशी गावात हा आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होता, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला, पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी सचिन भोसले याने त्याला अटक करतेवेळी पोलिस उप आयुक्त शिवाजी पवार आणि पोलिस उप निरीक्षक जऱ्हाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. स्व संरक्षणार्थ पोलिस उप आयुक्त यांनी दरोडेखोर सचिन भोसले यांच्या पायावर दोन राऊंड फायर केले. त्यातील एक राऊंड त्यांच्या पायाला लागून तो जखमी झाला आहे.या हल्ल्यात पोलीसही जखमी झाले आहेत.