AmravatiLatest News
अमरावतीत काँग्रेसचे धरणे आंदोलन – शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा

अमरावती :- अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे आणि अनेक प्रमुख नेते सहभागी झाले.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा उत्पादन खर्चानुसार योग्य दर मिळावा, तसेच महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे त्वरित ही कर्जमाफी पूर्ण करावी, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी होती.
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी आणि केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, या मागण्यांसाठी आज काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेसचा हा लढा पुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.