उड्डाण पुलावर फिरायला गेलेली युवती तोल जाऊन पडली; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

अमरावती :- अमरावतीतील राजकमल उड्डाण पुलावर सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 22 वर्षीय युवतीचा तोल जाऊन ती थेट पुलावरून खाली पडली. सध्या तिची प्रकृती गंभीर असून.
अधिक तपशील जाणून घेऊया…
अमरावती शहरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. शहरातील राजकमल परिसरातील जुन्या उड्डाण पुलावर फेरफटका मारण्यासाठी गेलेली 22 वर्षीय युवती अचानक पुलावरून खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती जेवण केल्यानंतर फेरफटका मारायला निघाली होती. पुलाच्या कठड्यावर बसलेली असताना तिचा तोल गेला आणि ती थेट पुलावरून खाली पडली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
राजापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि युवतीचा जबाब नोंदवला. तिच्या म्हणण्यानुसार, हा अपघात होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेनंतर उड्डाण पुलावर फिरताना किंवा कठड्यावर बसताना नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास राजापेठ पोलीस करत आहेत. अधिक माहितीसाठी पाहत राहा City News !