तक्षशिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
अमरावती :- श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित तक्षशिला महाविद्यालय श्याम नगर अमरावती येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्याने महाविद्यालयातील विज्ञान विभागाने विद्यार्थ्यांकरीता अतिथी व्याख्यान आयोजित केले होते यावेळी अतिथी म्हणून प्रा. डॉ. शीतल काळे तसेच अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी फुले, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट चे सीईओ प्रा. पी. आर. एस राव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रितेश पाटील, विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. पूजा म्हाला तसेच कॉमर्स ऍण्ड मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. स्वप्नील मानकर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच दादासाहेब गवई चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री दादासाहेब गवई तसेच ज्यांच्या शोधनाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येतो असे महान शास्त्रज्ञ सी. वी. रमन यांच्या प्रतिमांना हारार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रा. अपेक्षा भिडकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. यानंतर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ . शीतल काळे यांनी विद्यार्थ्यांना Empowering Indian Youth for Global Leadership in Science & Innovation for VIKSIT BHARAT या विषयावर अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले. या नंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रीतेश पाटील , तसेच श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे चे सीईओ प्रा.पी.आर.एस राव यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी फुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. स्वाती गवई, प्रा.अपेक्षा तसरे, प्रा.आदर्श येवले, प्रा. वैष्णवी इंगोले , प्रा. सोनाली कोलपकर प्रा. साक्षी पवार, प्रा. ललिता दार्सिंबे, प्रा.आचल साबळे, प्रा. मीनल ढोरे, प्रा. मीनाक्षी सर्वटकर व प्रा. प्रिया चापटे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लकी जवंजाळ तसेच आभार प्रदर्शन दिव्या वर्मा या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अनिल चौधरी व श्री. मंगेश वाघ यांचे सहाय्य लाभले.