नागपुर गुन्हे शाखेची मोठी कारवाई! वाहन चोरीतील २ आरोपींना अटक, ६ चोरीचे वाहन जप्त!

नागपुर :- नागपुर शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असतानाच गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एक मोठी कारवाई करत वाहन चोरीतील दोन आरोपींना अटक केली आहे.या कारवाईत तब्बल ६ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण पाहूया हा सविस्तर अहवाल…
नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एका मोठ्या कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. आमच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे चोरीच्या गाड्या कमी किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून वाहनचोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले.
गुन्हे शाखेच्या या कारवाईत पाचपावली, लकडगंज, कळमना आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये होंडा अॅक्टीव्हा आणि स्प्लेंडर मोटरसायकलीचा समावेश आहे. या कारवाईत आरोपींनी स्वीकारले की, त्यांनी विविध भागांतून गाड्या चोरून विक्री केल्या आहेत. या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, सह पोलीस आयुक्त निसार तंबोली, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकनीकर, सपोआ गुन्हे शाखा डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर काठोके, पोलीस अंमलदार भुषण भगत, कपिलकुमार तांडेकर, संतोषसिंह ठाकुर, दिपक दासरवार, विशाल रोकडे आणि प्रमोद देशभ्रतार यांचा मोलाचा सहभाग होता.या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील वाहनचोरीच्या घटनांवर मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, नागपूर पोलिसांच्या या झंझावाती कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर पोलीस सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा CITY NEWS!