नागपूरमध्ये भरधाव टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले – १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक फरार!

नागपूर :- नागपूर शहरात एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कळमणा पोलीस ठाणे हद्दीत भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी आहे. टिप्पर चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे?
पाहुया सविस्तर रिपोर्ट !
हा धक्कादायक अपघात दिनांक ४ मार्च २०२५ रोजी रात्री १२:४५ च्या सुमारास कळमणा हद्दीत घडला.
फिर्यादी प्रशांत अवचट यांचा १७ वर्षीय पुतण्या आयुष अवचट आपल्या मित्रासह होंडा शाईन मोटरसायकलने भारतनगर रोडमार्गे कळमणा मार्केटकडे जात होता. मात्र, गोकुळ डेअरी चौकात भरधाव टिप्पर क्रमांक MH 36 AB 2907 ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात आयुष अवचट गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र अमन मानकर (वय २१) सध्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. टिप्पर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून कळमणा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध IPC कलम 281, 106(1), 125(B) सह मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपी टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.
नागपूर शहरात वेगाने वाढणाऱ्या रस्ते अपघातांमुळे वाहनचालकांच्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नागरीकांनीही रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City NEWS.