महाबोधी विहार स्वाधीन करण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन

अमरावती :- बिहारमधील महाबोधी विहार बौद्ध भन्तेच्या ताब्यात द्यावा, या प्रमुख मागणीसाठी देशभरात आंदोलन छेडण्यात आले आहे. अमरावतीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो बौद्ध अनुयायी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुजन पक्षातील अनेक नेते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आपली मागणी लावून धरली.
पाहुयात या आंदोलनाचा संपूर्ण अहवाल...
महाबोधी विहार बौद्ध भन्तेच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. अमरावतीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी जमले. आंदोलनात खासदार बळवंत वानखडे, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, गुणवंत देवपारे यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी महाबोधी विहार भन्तेच्या हाती सोपविण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या.
महाबोधी विहाराच्या स्वाधीनतेसाठी बौद्ध भन्ते आणि अनुयायांनी घेतलेली भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पुढील घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.