मोर्शी पोलिसांची धडक कारवाई – वारंटविरुद्ध मोठी मोहीम

अमरावती, मोर्शी :- मोर्शी पोलिसांनी मोठी कारवाई करत वारंट असलेल्या आरोपींना अटक केली आहे. तब्बल 15 जणांना ताब्यात घेतले असून यात 13 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंटवर असलेल्या अनेक आरोपींवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मोर्शी डिबी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांतून छापे टाकत ही कारवाई केली. यात 13 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरकूल, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज साबळे, तसेच पोलीस कर्मचारी उमेश ढेवले, सुमित पिठेकर, विलास कोहळे आणि स्वप्नील बायस्कर यांचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली असून आणखी काही जण ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
वारंट असलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांची कठोर भूमिका दिसून येत आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लागेल, अशी अपेक्षा आहे. पुढील तपास मोर्शी पोलीस करत असून आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा City News!