रहाटगावच्या श्री जगदीश भगवान चंदनशेष मंदिरातून भव्य दिंडीचे आयोजन!

अमरावती :- रहाटगाव येथील श्री जगदीश भगवान चंदनशेष मंदिराच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भव्य त्रिशूल सादरीकरणासह ही दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या दिंडीत शेकडो भक्तगण सहभागी झाले होते.
या धार्मिक सोहळ्याची संपूर्ण माहिती घेऊया….
रहाटगाव येथील श्री जगदीश भगवान चंदनशेष मंदिराचा वर्धापन सोहळा आणि यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू आहे. सुधीर शंकर यावले यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. भक्तिभावाने न्हालेल्या या दिंडीत नेर पिंगलाई येथील हनुमान देवस्थानच्या वारकरी दिंडीनेही सहभाग घेतला.
या दिंडीत टाळ-मृदंगाच्या गजराने भक्तिभाव ओसंडून वाहत होता, तर विशेष आकर्षण ठरले भव्य त्रिशूल सादरीकरण. हजारोंच्या उपस्थितीत श्री जगदीश भगवान चंदनशेष महाराज ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या धार्मिक सोहळ्याचा मुख्य दिवस ३ मार्चला असून, या दिवशी भव्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तगण मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
तर पाहिलंत, रहाटगावमध्ये श्री जगदीश भगवान चंदनशेष मंदिराच्या वर्धापन सोहळ्याचा भक्तिमय उत्सव कसा जल्लोषात साजरा होत आहे. ३ मार्चला होणाऱ्या भव्य रथ यात्रेसाठी सर्व भक्तगण उत्सुक आहेत. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा City News.