वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्या! – शिंदे गट शिवसेनेचे आंदोलन

बीड :- बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिंदे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीतील राजकमल चौकात तीव्र आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान, वाल्मिक कराडच्या पोस्टरची फाडाफाड करण्यात आली आणि त्यावर चप्पलांचा वर्षाव करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात संताप व्यक्त केला.
युवासेना जिल्हाप्रमुख राम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे, शहर प्रमुख अजय महले, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख कोमल बद्रे, आरोग्य विभागाच्या सोनाली देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने, कामगार सेनेचे वेदांत तालन, तसेच पंकज मुळे, राजेश पाठक यांसह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
आमची मागणी मान्य झाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन करू!” असा इशारा आंदोलकांनी दिला असून राज्यसरकारवर दबाव टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.