विद्यापीठाच्या हिवाळी-2024 बी.एस.डब्ल्यू. सेमि.-4, बी.ए. सेमि.-1 व एम.टेक. (कॉस. टेक.) च्या फेरपरीक्षांची तारीख जाहीर

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2024 बी.एस.डब्ल्यू. सेमि. – 5 (सी.बी.सी.एस.) सोशल वेल्फेअर अॅन्ड डेव्हलपमेंट अॅडमिनीस्ट्रेशन, बी.ए. सेमि.-1 (एऩ.ई.पी.) मराठी लँग्वेज, एम.टेक. (कॉस टेक.) सेमि. -3 (एन.ई.पी.) अॅडव्हॉन्स कॉस्मेटीक टेक्नॉलॉजी – 3 या अभ्यासक्रमाच्या फेरपरीक्षांच्या तारखा विद्यापीठ प्राधिकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आल्या अहेत.
बी.एस.डब्ल्यू. सेमि. – 5 (सी.बी.सी.एस.) सोशल वेल्फेअर अॅन्ड डेव्हलपमेंट अॅडमिनीस्ट्रेशन विषयाची फेरपरीक्षा श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (205), बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय (402), यवतमाळ, लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ (412) या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
बी.ए. सेमि.-1 (एऩ.ई.पी.) मराठी लँग्वेज विषयाची फेरपरीक्षा गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शी टाकळी, जि. अकोला, (215), श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर 140), जे.डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूर (107), श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली, जि. बुलडाणा (308), एस.पी.एम. सायन्स, गिलाणी आर्टस् व कॉमर्स महाविद्यालय, घाटंजी (408) या परीक्षा केंद्रांवर, तर एम.टेक. (कॉस टेक.) सेमि. -3 (एन.ई.पी.) अॅडव्हॉन्स कॉस्मेटीक टेक्नॉलॉजी – 3 या विषयाची फेरपरीक्षा विद्याथ्र्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावरुन घेण्यात येणार आहे.
सदर तिनही विषयांंच्या फेरपरीक्षा सोमवार दि. 10 मार्च, 2025 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येणार असून परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेश पत्र सोबत आणावेत, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.