अकोल्याच्या जुन्या भाजी मार्केटमध्ये भीषण आग, लाखोंचे नुकसान!

अकोला :- अकोल्याच्या जुन्या भाजी बाजारात मध्यरात्री अचानक आग लागली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दोन दुकानांमधील लाखोंचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र, स्थानिक युवक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग नियंत्रणात आणली गेली. व्यापाऱ्यांना मात्र मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
पाहुया संपूर्ण अहवाल…
अकोल्याच्या जुन्या भाजी बाजारात मध्यरात्री दोन दुकानांना अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती की काही क्षणांतच संपूर्ण किराणा माल जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि स्थानिक मुस्लिम युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासन सध्या या आगीच्या कारणांचा शोध घेत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी या घटनेने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्रशासन या घटनेचा सखोल तपास करत आहे. पुढील अपडेटसाठी जोडले राहा City News सोबत !