अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर नवसाची होळी उभारण्याची 100 वर्षांची परंपरा कायम.

अमरावती :- आज आपण जाणून घेणार आहोत अमरावतीतील नवसाची होळी, जी तब्बल 100 वर्षांची परंपरा जपत आहे. चला, पाहूया संपूर्ण माहिती आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये!
अमरावतीतील श्री अंबादेवी एकविरा मंदिरासमोर नवसाची होळी उभारण्याची जुनी परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पार पडली. माघ पौर्णिमेला उभारण्यात आलेल्या या होळीत हेटीच्या झाडाच्या खोडाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, भक्तांनी नारळ, ओटी आणि गाठी वाहून आपली श्रद्धा व्यक्त केली. विशेष म्हणजे, अमरावतीसह बंगलोर आणि कोल्हापूर येथूनही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या पवित्र विधीत सहभाग घेतला.
तर अमरावतीतील नवसाची होळी ही केवळ एक परंपरा नसून, श्रद्धा आणि भक्तीचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. भविष्यातही ही परंपरा असाच उत्साह आणि भक्तिभावाने सुरू राहो, हीच प्रार्थना. आपण पाहात आहात City News, अधिक अपडेट्ससाठी जोडलेले राहा !