कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती

नाशिक :- आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून कोकाटे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर सरकारी योजनेमधील सदनिका लाटल्याच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. कोणत्याही विधानसभा सदस्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा सुनावल्यावर त्याचं सदस्यत्त्व रद्द करण्यात येते. मात्र या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे कोकाटे हे आमदार असून मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतील दहा टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. त्यांनी कागदपत्रांत फेरफार करून सदनिका मिळावल्याने माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांत ॲड. कोकाटेंसह त्यांच्या बंधूविरोधात भारतीय दंड विधान ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल ३० वर्षांनंतर २० फेब्रुवारी रोजी निकाल लागून कोकाटे बंधूंना पाच वेगवेगळ्या कलमांअंतर्गत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नरवाडिया यांनी दोषी ठरवले होते.
आता अपिल करताना शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज केला होता. तो कोर्टाने मंजूर केला असून आता दोन ऑर्डर झाल्या. एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती. त्यानंतर संपूर्ण शिक्षा स्थगित केली गेली आहे. आमचं म्हणणं होतं की, ट्रायल कोर्टाने जी का शिक्षा दिली आहे. ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नसून आम्हाला अपील चांगलं आहे. अपीलात मिळण्याची शक्यता आहे. जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाहीतर जास्त नुकसान होईल, असं मुद्दा घेऊन कोर्टाने स्टे दिल्याचंं वकिलांनी सांगितलं.