मंदिर व्यवस्थापन आदर्श करण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन गरजेचे!

अमरावती :- मंदिर व्यवस्थापन अधिक आदर्श करण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन होणे अत्यावश्यक आहे, असे मत महाराष्ट्र मंदिर महासंघाने व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीत ९ मार्च रोजी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ आयोजित करण्यात येत आहे.
पाहुया यावर एक सविस्तर रिपोर्ट!
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार केला. मात्र, आज मंदिर सरकारीकरण, अतिक्रमण आणि वक्फ बोर्डाच्या हस्तक्षेपाचा सामना करत आहेत. यामुळे मंदिर संस्कृती आणि श्रद्धेवर परिणाम होत आहे. मंदिर व्यवस्थापन अधिक आदर्श करण्यासाठी ९ मार्च रोजी अमरावतीत द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अधिवेशनामुळे मंदिर व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही 8007630913 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. पाहत राहा City News.