मार्टिन पुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर :- नागपूरच्या मार्टिन पुलावर आज एका दुर्दैवी अपघातात युवकाचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे विकास बोरकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर जमावाने संतापून ट्रक चालकाला मारहाण केली. मात्र, वेळीच पोलीस दाखल झाल्याने चालकाचा जीव वाचवता आला. संपूर्ण घटना नेमकी काय आहे.
पाहुया हा सविस्तर रिपोर्ट!
नागपूरच्या मार्टिन पुलावर आज सकाळी हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० सीएम ५१५६ क्रमांकाच्या ट्रकने विकास बोरकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, विकास बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर मृतकाच्या बहिणीने आपल्या भावाची ओळख पटविली. अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि जमावाने ट्रक चालकाला पकडून बेदम मारहाण केली.
मात्र, वेळीच नाकाबंदी ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे.
मार्टिन पुलावरील या अपघाताने पुन्हा एकदा नागपूर शहरातील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. भरधाव वाहने आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. City News वर आम्ही या प्रकरणावर पुढील अपडेट्स देत राहू. पाहत राहा City News!