लग्नाचा विश्वासघात – सुरज तायडे याने 9 महिन्यांपूर्वी कोमलसोबत प्रेमविवाह केला होता.

अकोला :- अकोल्यात खऱ्या आयुष्यात ‘पती-पत्नी और वो’चा सिक्वेल घडला आहे. एका व्यक्तीनं बायकोच्या अनुपस्थितीत तिच्याच मामेबहिणीसोबत लग्न केलं आणि बायकोला घरी येऊ नकोस असा आदेश दिला. मात्र, बायकोने थेट अकोला गाठत पोलिस ठाण्यातच नवऱ्याची धुलाई केल्याची घटना समोर आली आहे!
बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा गावात राहणारा सुरज तायडे आणि शिवणी येथील कोमल यांचं प्रेमविवाहानंतर सुखी संसार सुरू होता. मात्र, अमरावतीला शिक्षणासाठी गेलेल्या कोमलच्या अनुपस्थितीत सुरजने तिच्या मामेबहिणीसोबतच लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कोमलला याची माहिती व्हिडिओ कॉलद्वारे मिळाली आणि ती संतापून अकोल्याला पोहोचली. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या कोमलने अचानक नवऱ्याला पाहून राग अनावर झाला आणि त्याच्या कानाखाली वाजवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केलं आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हा प्रकार पाहून काहीजणांना ‘पती-पत्नी और वो’ चित्रपटाची आठवण झाली असेल, पण या वास्तवात बायकोने न्याय मिळवण्यासाठी थेट पतीची धुलाई केल्याची घटना अनेकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. आता पुढे काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!